पुणे शहरात एकाच भागात आहेत, 42 टक्के कोरोना रुग्ण; दाटवस्ती ठरली कारण

bhavani.jpgbhavani.jpg
bhavani.jpgbhavani.jpg

पुणे : पुणे शहरात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या एकूण संख्येपैकी जवळपास 42 टक्के रुग्ण हे भवानी पेठ आणि ढोलेपाटील या दोन क्षेत्रीय कार्यालयातंर्गत असल्याचे समोर आले आहे. तर सर्वांत कमी म्हणजे एक टक्‍क्‍यापेक्षाही कमी रुग्ण हे कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत असल्याचे महापालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

यावरून दाटवस्ती आणि झोपडपट्ट्यांचा भाग हा कोरोनासाठी पोषक ठरत असल्याचे समोर आले आहे. पुणे शहरात कोरोना बाधित पहिला रुग्ण नऊ मार्च रोजी आढळून आला. त्यास उद्या दोन महिने पूर्ण होत आहेत. या दोन महिन्यांच्या कालावधीत पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या ही दोन हजाराहून अधिक झाली आहे. दरम्यान, क्षेत्रीय कार्यालयानिहाय रुग्णांची संख्या किती आहे, याची आकडेवारी महापालिकेकडून दररोज प्रसिद्ध केली जाते.

बुधवारी (ता. 6) महापालिकेकडून पंधरा क्षेत्रीय कार्यालयानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2 हजार 40 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 65 रुग्ण हे पुणे शहर हद्दीबाहेरील आहेत. उर्वरित 2 हजार 32 पैकी सर्वाधिक म्हणजे 451 म्हणजे 24 टक्के रुग्ण हे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत, तर त्या खालोखाल 347 म्हणजे 18 टक्के रुग्ण हे ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आहे. त्यावरून पुणे शहरात बुधवारपर्यंत सापडलेल्या एकूण रूग्णसंख्येपैकी जवळपास 42 टक्के रुग्ण हे या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असल्याचे दिसून आले आहेत.

तसेच घोले रोड क्षेत्रीय कार्यलयातंर्गत 247 म्हणजे 13 टक्के, येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 236 म्हणजे 12 टक्के रुग्ण आढळले आहेत. उर्वरित अकरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सापडलेल्या रुग्णांची संख्या ही दहा टक्‍क्‍यांच्या आत आहे. 
भवानी व ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत का वाढते रुग्ण संख्या शहरातील दाटवस्ती आणि सर्वाधिक झोपडपट्ट्यांचा भाग या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येतो. पुणे शहरात एकूण 486 झोपडपट्ट्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 65 झोपडपट्ट्या या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येतात. त्या खालोखाल 57 झोपडपट्ट्या या ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, भवानी आणि कसबा -विश्रामबागनंतर ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर पेठांचा भाग येतो. येथील नगर रचना नियमानुसार लोकसंख्येची घनता हेक्‍टरी 200 ते 250 ती या भागात 500 ते 700 पर्यंत आहे. कष्टकरी आणि मजूरवर्ग मोठ्या प्रमाणावर या भागात राहतो. सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृहाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. एका झोपडपट्टीत आठ ते दहा जण राहतात. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग पाळणे शक्‍य होत नाही. त्यामुळे या भागात वेगाने या विषाणूचा प्रसार होण्यास मदत होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com