मॉस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यास पुण्यातील चाकणमध्ये अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

आकाश 2013 पासून भाकपा माओवादी संघटनेचे काम करतो. अनेक कटांत त्याचा सहभाग आहे. एसपी अमरजीत बलिहार यांच्या हत्येतील तो मुख्य आरोपी आहे. तसेच 2014 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत त्याने बिहारमधील मतदान केंद्रे उडवून लावली होती. 

पुणे : मागील अनेक दिवस पोलिसांच्या रडारवर असलेला नक्षलवादी आकाश मुर्मू उर्फ साहेब हांसदाला बिहार पोलिसांनी चाकणमध्ये अटक केली. या वॉन्टेड नक्षलवाद्यासाठी एक लाख रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. मात्र पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने त्याला त्वरित चाकणमधून अटक करण्यात आली.  

अभिजित बॅनर्जी : राहुल गांधीच्या 'न्याय' योजनेचे शिल्पकार, तर मोदींच्या नोटांबदींचे विरोधक

आकाश 2013 पासून भाकपा माओवादी संघटनेचे काम करतो. अनेक कटांत त्याचा सहभाग आहे. एसपी अमरजीत बलिहार यांच्या हत्येतील तो मुख्य आरोपी आहे. तसेच 2014 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत त्याने बिहारमधील मतदान केंद्रे उडवून लावली होती. 

भारतात सव्वाशे दहशतवादी - एनआयए

इतर नक्षलवाद्यांसह आकाशने अनेक कटांत सहभागी होत अनेक देशविरोधी कृत्य केली आहेत. गेले अनेक दिवस बिहार पोलिस त्याच्या मागावर होते. बिहारमधून पळून येऊन पुण्यातील चाकणमध्ये लपून बसला होता. तसेच चाकणमधील एका कंपनीत मागील 15 दिवसांपासून तो मजूर म्हणून काम करत होता. बिहार पोलिसांनी आज (ता 15) अखेर सापळा रचून त्याला अटक केली.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: most wanted Naxalite Akash arrested from Chakan Pune