'ते' मायेचे हात कायमचे दुरावले...

संदीप घिसे 
शुक्रवार, 29 जून 2018

पिंपरी (पुणे) : मम्मी पप्पांची लाडकी पूजा हिचा बुधवारी वाढदिवस घरांमध्ये अगदी धुमधडाक्यात साजरा झाला. यामुळे सूर्यवंशी कुटुंबीय अगदी आनंदात होते. मात्र त्यांचा हा आनंद नियतिलाही मान्य नसावा. त्यांच्या या सुखाला कोणाची तरी नजर लागली आणि या आनंद सोहळ्यास चोवीस तास उलटत नाहीत तोच पूजेच्या मम्मी पप्पांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 'आपल्याला शाळेतून घरी लवकर का आणले? आपले मम्मी पप्पा कुठे आहेत' हे पूजा आणि तिचा नऊ वर्षीय भाऊ कृष्णा यांना कळत नव्हते. शेजारी त्या दोघांना जवळ घेऊन त्याच्या तोंडावरून हात फिरवत होते.

पिंपरी (पुणे) : मम्मी पप्पांची लाडकी पूजा हिचा बुधवारी वाढदिवस घरांमध्ये अगदी धुमधडाक्यात साजरा झाला. यामुळे सूर्यवंशी कुटुंबीय अगदी आनंदात होते. मात्र त्यांचा हा आनंद नियतिलाही मान्य नसावा. त्यांच्या या सुखाला कोणाची तरी नजर लागली आणि या आनंद सोहळ्यास चोवीस तास उलटत नाहीत तोच पूजेच्या मम्मी पप्पांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 'आपल्याला शाळेतून घरी लवकर का आणले? आपले मम्मी पप्पा कुठे आहेत' हे पूजा आणि तिचा नऊ वर्षीय भाऊ कृष्णा यांना कळत नव्हते. शेजारी त्या दोघांना जवळ घेऊन त्याच्या तोंडावरून हात फिरवत होते. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरून दररोज फिरणारे मायेचे हात आता कायमचे दूर गेल्याची पुसटशी कल्पनाही या भावंडांना नव्हती. भांबावलेल्या डोळ्यांनी ते फक्त घटना पाहात होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती. 

उत्तम तुकाराम सूर्यवंशी (वय 37) आणि मुक्ता उत्तम सूर्यवंशी (वय 31  रा. भोसले वस्ती, चऱ्होली. मुळगाव मु.पो. निळा ता. पूर्णा जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांनी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास राहत्या घरी छताच्या लोखंडी हुकाला वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुक्ता यांचा चुलत भाऊ माधव सवंडकर हे देखील सुर्यवंशी कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत. ते दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यावेळी पूजा आणि कृष्णा हे दोघेही शाळेत गेले होते.

उत्तम हे वायरमन असून ते ठेकेदाराकडे कामाला होते. तर मुक्ता या गृहिणी होत्या. 2008 मध्ये विवाह झाल्यानंतर ते चऱ्होली परिसरात वास्तव्यास आले. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणत्याही प्रकारची चिठ्ठी लिहून न ठेवल्याने आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत अधिक तपास दिघी पोलिस करीत आहेत.

Web Title: mother and father suicide in pimpari pune

टॅग्स