देवाची कमाल : बाळ सुखरूप; बाळंतीणीला कोरोना

baby.jpg
baby.jpg

केडगाव (पुणे) ः पारगाव (ता. दौंड) येथील एका कोरोनाग्रस्त महिलेने बाळाला जन्म दिला अन् बाळ सुदैवाने सुखरूप आहे. ही महिला गु-हाळघरात काम करीत असून तीचे मूळ गाव खांडवा (मध्यप्रदेश) आहे.

दरम्यान, महिलेने चिमुकलीला जन्म दिला असून तीच्या कोरोना अहवालाकडे लक्ष लागले आहे.  याशिवाय पारगावातील अन्य येथील एका शेतक-याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माहिती आरोग्य अधिकारी डॅा. रणजित भंडलकर यांनी दिली. पारगाव-नानगाव रोडलगत पोपटराव ताकवणे यांचे गु-हाळ आहे. त्यांनी हे गु-हाळ चालविण्यास दिले आहे. गु-हाळघरात काम करणा-या परप्रांतीय गर्भवती महिलेच्या पोटात दुखू लागल्यानंतर तीला शुक्रवारी (ता. ३)  १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेतून ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे या महिलेली कोरोनाची चाचणी घेण्यात आली. चाचणीतून या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान ही महिला काल (ता. ४ ) बाळंत झाली असून, ती व तीचे बाळ सुखरूप आहे. पारगावातील अन्य एका शेतक-याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या शेतक-याचा केडगाव - हंडाळवाडीतील मामाला चार दिवसांपुर्वी कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांवर यवत येथे उपचार करण्यात येत आहे. या घटनेमुळे पारगावमध्ये १४ दिवस लॅाकडाऊन पाळण्यात येणार आहे. पारगावात कोरोनाशी संबंधित सर्व उपाययोजना करण्यात येतील. ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे सरपंच जयश्री ताकवणे यांनी म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com