तरुणीचा जबरदस्तीने विवाह, आई वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल 

संदीप घिसे 
शनिवार, 21 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे) : एका १९ वर्षीय तरुणीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. या प्रकरणी त्या तरूणीने आपल्या आई-वडिलांसह पंधरा जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दिप्ती गायकवाड (वय १९, रा. जुनी सांगवी) या तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आई अनिता गायकवाड (वय ३६), वडील दयानंद गायकवाड (वय ४६),  शामा मच्छिंद्र माने (वय ५४), मच्छिंद्र माने (वय ४६), रवी माने (वय २९) शामल रवी माने (वय २५ रा.पटेकर चाळ, ढोरगल्ली), रूपाली राहुल भांडळे (वय ३०), राहुल भांडळे (वय ३१,), उत्तम विठ्ठल काळे आणि इतर सहाजण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीचे आईवडील आहेत. फिर्यादी दिप्तीचे लग्न तिला न विचारता ठरवण्यात आले. ते त्यांना मान्य नव्हते. दीप्ती यांनी नवऱ्या मुलालाही पाहिलेले नव्हते. 'स्थळ आहे म्हणून तुला लग्न करायचे आहे', असे सांगून दिप्ती यांना जबरदस्तीने गाडीत बसवुन तेरखेड येथे नेले. तिथे पती म्हणून उत्तम विठ्ठल माने यांना दाखविले. 'नवरा मुलगा पप्पा पेक्षाही मोठा दिसतो व त्याचे पहिले लग्न झाले आहे. त्यास चौदा वर्षांची मुलगी देखील आहे त्यामुळे आपण तिच्याशी लग्न करणार नाही,' असे दिप्तीने आपल्या पालकांना स्पष्ट शब्दात सांगितले.

त्यावेळी एका आरोपीने 'तो तुझ्या आई वडिलांना पुण्यामध्ये फ्लॅट घेऊन देणार आहे. तसेच तो शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार दिल्यास तुला बघून घेईल,' अशी धमकी दिली, मला मुलगा पाहिजे यासाठी तुझ्यासोबत लग्न करणार आहे,' असे नवऱ्या मुलाने सांगितले. २२ मार्च २०१८ रोजी दीप्ती यांना आळंदी येथे जबरदस्तीने नेऊन लग्न लावून दिले. २० एप्रिलला दीप्ती यांनी सांगवी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: mother father force to marriage their daughter