किरकोळ भांडणातून मुलाने केला आईचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

चव्हाण कुटुंबीय गणेश नगरमधील तारांगण सोसायटी मध्ये राहते. शुक्रवारी रात्री आई लीलाबाई व मुलगा गणेश यांच्यात किरकोळ घरगुती कारणावरून भांडणे झाली. त्यामध्ये गणेशने स्वयंपाकघरातील चाकूने आईच्या पोटावर वार केले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

वाघोली : आई व मुलामध्ये झालेल्या घरगुती भांडणामुळे संतप्त झालेल्या मुलाने आईवर चाकूने वार करून तिचा खून केला. ही घटना वाघोली येथील गणेशनगर परिसरामध्ये शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मुलास अटक केली आहे. 

बारामती कोणत्या पवारांसोबत? ऐका लोक काय म्हणताहेत...

लीलाबाई श्‍यामराव चव्हाण ( वय 52 ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर गणेश चव्हाण ( वय 32 ) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चव्हाण यांची मुलगी प्रिया रवींद्र भोसले ( रा वाघोली ) यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यातील नगरसेवकांचे अजित पवारांना बळ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण कुटुंबीय गणेश नगरमधील तारांगण सोसायटी मध्ये राहते. शुक्रवारी रात्री आई लीलाबाई व मुलगा गणेश यांच्यात किरकोळ घरगुती कारणावरून भांडणे झाली. त्यामध्ये गणेशने स्वयंपाकघरातील चाकूने आईच्या पोटावर वार केले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन गणेश यास अटक केली. गणेशचे वडील आजारी असून ते घरीच असतात. आईचा खून करण्यामागे नेमके घरगुतीच कारण आहे, की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.

इंदापूरचे आमदार भरणे अजित पवारांच्या पाठीशी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother murdered by Child over minor dispute