मुलीचे संगोपन करता येत नसल्याने आईची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

हडपसर - उच्चशिक्षित आईने चार महिन्यांच्या मुलीचे संगोपन करता येत नसल्याच्या कारणावरून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. फुरसुंगी येथे ही धक्कादायक घटना घडली. 

हडपसर - उच्चशिक्षित आईने चार महिन्यांच्या मुलीचे संगोपन करता येत नसल्याच्या कारणावरून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. फुरसुंगी येथे ही धक्कादायक घटना घडली. 

प्रीती सूरज लांडगे (वय 23, रा. जयहिंदनगर, फुरसुंगी), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक बी. एस. डोईफोडे यांनी याबाबत माहिती दिली. प्रीतीचे शिक्षण बी. ई. कॉम्प्युटरपर्यंत झाले होते. त्यानंतर 2015 मध्ये तिचा विवाह झाला. बाळंतपणासाठी ती माहेरी फुरसुंगी येथे आली होती व चार महिन्यांपूर्वी तिने मुलीला जन्म दिला होता. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कपड्यांना इस्त्री करून येते, असे सांगून ती घराबाहेर पडली. मात्र, रात्र झाली तरी ती परतली नाही. म्हणून आई-वडिलांनी तिचा शोधा घेतला, परंतु ती आढळून आली नाही. त्यामुळे आई-वडिलांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर सोमवारी सकाळी अकरा वाजता घरापासून जवळच असलेल्या विहिरीत प्रीतीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना तिने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली आहे. त्यात तिने मी चार महिन्यांच्या मुलीचे संगोपन करू शकत नाही, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. तसेच माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे. 

Web Title: mother suicide