चिमुकल्यासह तिने स्वत:ला पेटविले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दीड वर्षाच्या मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या केली.

वडगाव मावळ (पुणे) : मळवंडी ढोरे येथे मंगळवारी दुपारी स्नेहा सोमनाथ ढोरे (वय 26) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दीड वर्षाच्या मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी तिच्या पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
पती सोमनाथ रामभाऊ ढोरे (वय 29), सासू लक्ष्मीबाई रामभाऊ ढोरे, नणंद पिंकी चांदेकर (रा. आढले बुद्रुक) व सुनीता सावंत (रा. गोडूंब्रे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. स्नेहाचे वडील संतोष सोपान कुंजीर (वय 49, रा. गहुंजे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 

या फिर्यादीनुसार स्नेहा हिचा सोमनाथ याच्याशी सुमारे अडीच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला स्पर्श हा दीड वर्षाचा मुलगा होता. ती पाच महिन्यांची गर्भवती होती. दोन वर्षांपासून तिचा मानसिक छळ होत होता. पती तिच्याशी व्यवस्थित वागत नव्हता तर सासू व नणंदाही त्यात भर घालत होत्या. त्याला कंटाळून स्नेहा हिने दीड वर्षाच्या मुलासह राहत्या घरात पेटवून घेऊन आत्महत्या केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother suicide with child in maval

टॅग्स