मदर तेरेसा यांची जयंती साजरी

रमेश मोरे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी : भारतरत्न, नोबेल पुरस्कार विजेत्या संत मदर तेरेसा यांची 108 व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथे 'सेवादिन' म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी मदर तेरेसा यांच्या जीवनावरील माहिती लहान मुलांना सांगण्यात आली. मदर तेरेसा यांच्या जिवन जनतेची सेवा करण्यात गेले. भावी पिढीला त्यांच्या जिवनकार्याची माहिती देण्यात आली. 

बोपोडी येथील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ पुणे व खडकी कॅथॉलिक असोसिएशन तसेच सेंट मेरी चर्च खडकी सर्व सभासद व कमिटी मेंबर यांच्या वतीने यावेळी केक कापण्यात आला. यावेळी पुणे धर्मप्रांत बिशप राईट रेव्ह शरद गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मदर तेरेसा यांनी भारतासह जगभरात कुष्ठरोगाने पिडित, दुर्बल घटकांची सेवा केली. त्यांच्या सेवाकार्याचा वसा तरूण युवा पिढीने जपला पाहिजे. असे यावेळी मनोगत व्यक्त केले.

याचबरोबर बिशप म्हणाले, सध्या समाजात मदर तेरेसा यांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांच्या सेवाकार्याचा आदर्श विचार तरूण पिढीने अंगिकारला पाहिजे. यावेळी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ पुणे पदाधिकारी विल्यम चंदनशिव, संजय उरणकर, रितेश गोर्डे, शेखर चांदणे, कुशल सोज्वळ, सुधीर पाडळे, सुभाष क्षत्रिय, रेव्ह सुनिल राऊत पाळक, मार्कस गोर्डे, पॉल नायर, राजेश साने, सुधीर तोरणे, अशोक शिरसाठ, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गोर्डे यांनी केले. तर आभार दिलराज पिल्ले यांनी मानले.

Web Title: Mother Teresa birth anniversary Celebration