Vidhan Sabha 2019 : अवघ्या दीड महिन्याच्या लेकीला घेऊन पायपीट करत तिने केले मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पाले पठार या ठिकाणी राहणाऱ्या सुमन आखाडे हिने आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन  चार किमी. डोंगरातून खडतर मार्गक्रमण करत मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावला.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पाले पठार या ठिकाणी राहणाऱ्या सुमन आखाडे हिने आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन  चार किमी. डोंगरातून खडतर मार्गक्रमण करत मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावला.

पाले येथे मतदान केंद्र असून पाले ते पाले पठार हे सुमारे चार किमी अंतर आहे. सतत पडणारा पावसाने निसरड्या झालेल्या पाऊलवाटा अन वाढलेल्या थंडीतून मार्ग काढून मतदान केंद्रावर पोहचल्या. घराच्यांनी 'इतका अडचणींतून तू जाऊ नकोस', असे सांगितले होते तरीही, तिने सगळ्यांचा विरोध नाकारून आपला मतदानाचा हक्क बजावला.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A mother voted with her infant covering distance of 5 km in Vadgav Maval