जागतिक मातृदिनानिमित्त मातांचा गौरव

सांगवी येथील 
सोमवार, 21 मे 2018

जुनी सांगवी - कै. आनंदराव भोसले प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक मातृदिनानिमित्त "आदर्श माता गौरव पुरस्कार २०१८" देण्यात आले.कीर्तनकार निर्मल महाराज देवाची आळंदी व अजित काळभोर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन यामध्ये आदर्श मातांना गौरविण्यात आले. येथील सौ सुनंदा ढोरे, (आदर्श माता) शारदा मुंढे (समाज प्रबोधनकार) सुनंदा श्रीखंडे, अमृता गुंजाळ यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी ह.भ.प. गुरुवर्य निर्मल महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले आई वडिलांनी मुलामुलींमधे भेदभाव न करता दोघांना समान प्रेम द्यावे. मुलगी आहे म्हणुन घरातील कामाच्या जबाबदा-या मुलीवरच न लादता घर कामात मुलांवरही जबाबदा-या टाकाव्यात यामुळे मुलांनाही घरकामाची सवय लागेल. घरातील प्रेम, नाती टिकुन राहतील. 

कार्यक्रमास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पोपटराव भोसले दत्तात्रय भोसले , विलासराव चव्हाण, संजय मराठे, विजयसिंह भोसले उपस्थित होत. सौ, रुख्मिणी भोसले यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ, छाया भोसले यांनी केले.

Web Title: Mother's glory on the occasion of World Mother's Day