पुणे : तीन मुलांचा गळा आवळून आईची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

पिंपरी : आईने तीन मुलांचा गळा आवळून खून करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथे रविवारी सायंकाळी उघडकीस आली.

पिंपरी : आईने तीन मुलांचा गळा आवळून खून करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथे रविवारी सायंकाळी उघडकीस आली.

फातिमा असरम बागवान (वय 28 ) असे महिलेचे नाव आहे. तर अल्फिया अशरम बागवान (  वय ९) ,  जोया अशरम बागवान (वय 7) जियान अश रम बागवान ( वय 6)  अशी गळा आवळून खून केलेल्या मुलांची  नावे आहेत. 

पाच दिवसांपूर्वीच हे कुटुंब भोसरीतील नुरी मोहल्ला येथील न्यू प्रियदर्शनी स्कूल जवळ एका इमारतीत राहिला आले होते.  फातिमा यांचे पती अशरम रविवारी सकाळी दहा साडेदहा वाजता काम शोधण्यासाठी बाहेर गेले होते. सायंकाळी चारच्या सुमारास ते  घरी आल्या नंतर ही घटना उघडकीस आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mothers suicide after three children murder in Pimpri pune

टॅग्स