आलिशान मोटारीच ‘लक्ष्य’

Motor-Theft
Motor-Theft

पिंपरी - शहरात मोटार चोरणारी टोळी सक्रिय झाली असून, चोरटे आलिशान मोटारींना लक्ष्य करीत आहेत. तांत्रिक पद्धतीने लॉक उघडून मोटार चोरल्याच्या घटना सीसीटीव्ही फुटेजवरून समोर येत आहेत. त्यामुळे चोरट्यांच्या भीतीने वाहनमालक धास्तावले आहेत.

वाहन चोरीला जाण्याच्या घटनांची शहरातील विविध पोलिस ठाण्यात नोंद होत आहे. त्यात महागड्या मोटारींचाही समावेश आहे. शहरातील बहुतांश मोटारी एकाच पद्धतीने चोरीला गेल्या असून, या सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाल्या आहेत. यमुनानगर-निगडी येथील सेक्‍टर क्रमांक २३ येथे हेमराज पाटील यांनी घरासमोरील पदपथावर ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मोटार उभी केली होती. मात्र रात्री चोरट्यांनी ही मोटार पळविली.

याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आलिशान मोटारीतून चोरटे आले. त्यांनी आपल्या मोटारीत बसूनच रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारीचे सेंट्रल लॉक उघडले व गाडी घेऊन फरार झाले. 

मागील काही दिवसांत निगडी परिसरासह शहराच्या इतर ठिकाणीही वाहनचोरीच्या घटना घडल्या. या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता तशाच पद्धतीने चोरट्यांनी वाहन चोरल्याचे दिसून आले. मात्र, पोलिसांना अद्यापही चोरट्यांपर्यंत पोचण्यात यश आलेले नाही. पंधरा ते वीस लाख रुपये किमतीच्या मोटारी काही मिनिटांतच गायब होत असल्याने वाहनमालकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविणे आवश्‍यक आहे. यासह चोरीची घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तपासाला वेग देत चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com