पुण्यात मोटू पतलू कार्टुनच्या गळ्यात अडकवली नितेश राणे नावाची पाटी , युवासेनेचा विरोध

Motu Patlu Nitesh Rane Narayan Rane Yuva Sena BJP Protest Pune
Motu Patlu Nitesh Rane Narayan Rane Yuva Sena BJP Protest Pune

पुणे : भाजप आमदार नितेश राणे यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाईंवर आरोप केले होते. त्यावरुन शिवसेना युवा सेना आणि भाजपात निर्माण झालेला वाद चिघळला आहे. पुणे जिल्हा युवा सेनेच्यावतीने वाघोली येथे मोटू-पतलू कार्टूनच्या गळ्यात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या नावाच्या पाट्या अडकवून, हातात कोबंड्या पकडून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख मच्छिंद्र सातव यांच्या सह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

नितेश राणे यांनी वरुण सरदेसाईंवर सचिन वाझे प्रकरणात नाव घेऊन गंभीर आरोप केले होते.  सचिन वाझे आयपीएल सुरु झाल्यानंतर सट्टेबाजांना धमकी देऊन १५० कोटींची खंडणी मागितली होती. दरम्यान, नितेश राणेंच्या आरोपांना वरुण सरदेसाईंचे सणसणीत प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान या आरोप प्रत्यारोपारवरुन शिवसेना युवा सेना आणि भाजपात वाद चिघळला आहे. पुणे जिल्हा युवा सेनेच्यावतीने वाघोलीत नितेश राणे आणि नारायणा राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नितेश राणेंनी काय आरोप केले?
सध्या महाराष्ट्रात मनसुख हिरेन-सचिन वाझे प्रकरण गाजत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे कुटुंबीयांचे नातेवाईक असलेल्या वरूण सरदेसाईंचे सचिन वाझेंसोबत आर्थिक संबंध असल्याचेही राणे म्हणाले. 

सट्टेबाजांच्या प्रकरणात सचिन वाझेंसोबत आणखी एकानावाचा उल्लेख
"सचिन वाझेंनी सट्टेबाजांना खंडणीसाठी फोन केला की वाझेंना दुसऱ्या माणसाचा फोन येतो. सट्टेबाजांकडून जे पैसे मागितलेत त्यात आमचं काय? आम्हाला त्यातला किती हिस्सा?, अशी विचारणा या माणसाकडून केली जाते. हा माणूस इतर कोणीही नसून वरुण सरदेसाई आहे. वाझे आणि सरदेसाई यांच्यातील संभाषणाची चौकशी करण्यात यायला हवी. या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय-काय बोलणं झालं आहे याचीही माहिती घेतली जायला हवी", अशी मागणी त्यांनी केली.

Alert: पुणे जिल्ह्यात ६७ कोरोना हॉटस्पॉट; ग्रामीण भागाने ओलांडला पाऊण लाखांचा
टप्पा!


नितेश राणेंच्या आरोपांना वरुण सरदेसाईंचे सणसणीत प्रत्युत्तर
नितेश राणे यांनी माझ्यावर घाणेरडे , खोटे आरोप केले असून त्यामध्ये अजिबात तथ्य नाही. माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करुन दाखवावेत अन्यथा मी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com