लेण्याद्री: पुरातत्व विभागाच्या शुल्क आकारणी विरोधात आंदोलन

दत्ता म्हसकर
गुरुवार, 29 मार्च 2018

जुन्नर - अष्टविनायक श्री. लेण्याद्री गणपती येथील भारतीय पुरातत्व संशोधन विभाग घेत असलेले देवदर्शन शुल्क बंद करण्यासाठी सलग दहा वर्ष पाठपुरावा सुरू आहे. खासदार आढळराव यांनी पुरातत्व विभागाच्या केंद्रीय कार्यालयाकडून या विषया संदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे. सदर लढा अंतीम टप्प्यात असून, दि. 3 एप्रिल रोजी पुरातत्व विभागच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आयोजित केली आहे.

पुरातत्व विभागाने गणेश दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिरात नि:शुल्क प्रवेश देणे व इतर लेण्या पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून शुल्क घेण्याचा निर्णय घेतला नाही, तर शिवसेनेने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाच्या नियोजनासाठी शिवसेनेच्या गोळेगाव प्रतिनिधींना खासदार आढळराव यांनी लांडेवाडी येथे बोलावले होते 

यावेळी गोळेगावचे माजी सरपंच शिवसेना शाखा प्रमुख व तंटामुक्ती अध्यक्ष गणेश लोखंडे, हरी मारुती ताम्हाणे, शिवराम वऱ्हाडी व आंदोलनाचे समन्वयक हर्षल जाधव हे उपस्थित होते. दिनांक 3 एप्रिल रोजी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.

Web Title: Movement against the charges of the Archaeology Department