कचरा प्रकल्पाविरोधात हडपसरमध्ये आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

हडपसर - रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रकल्पाचे काम थांबवावे यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट व आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ठिय्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. 

याप्रसंगी नगरसेवक वैशाली बनकर, आनंद आलकुंटे, योगेश ससाणे, अशोक कांबळे, पूजा कोद्रे, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक सुनिल बनकर, आबा कापरे, सागराजे भोसले यासंह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

महापालिकेत व राज्यात भाजापाची सत्ता असून या भागात केवळ कचरा, डुकरं, कारकस असे घाणीचे सर्व प्रकल्प हडपसर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या भागात कोणत्याही परिस्थीतीत नवीन कचरा प्रकल्प होवू देणार नाही, अशी ठाम भूमीका आंदोलन कर्त्यांनी घेतली. 

Web Title: Movement against the garbage project in Hadapsar