पुण्यात महाजनादेश यात्रेत मराठा क्रांती मुक मोर्चाचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी(ता.14) पुण्यात येणार आहेत. डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळा येथून जाणार आहे. यानिमित्ताने मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात लक्षवेधी आंदोलन करत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी दिली आहे.

पुणे : महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी(ता.14) पुण्यात येणार आहेत. डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळा येथून जाणार आहे. यानिमित्ताने मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात लक्षवेधी आंदोलन करत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी दिली आहे.

मागील तीन वर्षांच्या मराठा क्रांती मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे, राज्यातील गड आणि किल्ल्यांवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा निर्णय रद्द करणे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करणे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्तता अद्याप देखील झाली नाही. या मागण्यासाठी शनिवारी (ता.14)  सायंकाळी 4 ते  6 वाजण्याच्या सुमारास डेक्कन येथील संभाजी महाराजाच्या पुतळ्यास अभिवादन करून सरकार विरुद्ध लक्षवेधी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती शांताराम कुंजीर यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा तीव्र लढा उभाणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांच्याकडून देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement of Maratha Kranti Muk Morcha during the Mahajanesh Yatra in Pune