डोणजे, गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्दसाठी फिरता दवाखाना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

श्री सत्यसाई सेवा संघटना, पुणे यांच्या माध्यमातून सिंहगड परिसरातील २५ गावांसाठी मोफत फिरती वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली. श्री सत्यसाई प्रेम रथ या फिरत्या दवाखान्याचे उद्‌घाटन गोऱ्हे खुर्द येथील झाळण देवी मंदिरात झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरादरम्यान करण्यात आले.

किरकटवाडी - श्री सत्यसाई सेवा संघटना, पुणे यांच्या माध्यमातून सिंहगड परिसरातील २५ गावांसाठी मोफत फिरती वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली. श्री सत्यसाई प्रेम रथ या फिरत्या दवाखान्याचे उद्‌घाटन गोऱ्हे खुर्द येथील झाळण देवी मंदिरात झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरादरम्यान करण्यात आले.

डोणजे, गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मालखेड, वरदाडे, निगडे, आंबी, सोनापूर, कुरण, पानशेत यासह आजूबाजूच्या इतर गावांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध असणार आहे. संघटनेच्या माध्यमातून झाळण देवी मंदिरात घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ७७७ जणांची तपासणी करण्यात आली. काही रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. दृष्टिदोष असणाऱ्या २५० रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्वचारोग व इतर रुग्णांसाठी औषधांचे वाटप करण्यात आले. गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्यांवर तातडीने उपचार होणे गरजेचे असल्याचे संघटनेचे पदाधिकारी दिलीप भामे यांनी सांगितले. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी भव्य आरोग्य शिबिर घेणार असल्याचे श्री सत्यसाई संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

खेड्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी या फिरत्या दवाखान्याचा भविष्यात मोठा उपयोग होणार आहे,’ असे मत या वेळी गोऱ्हे खुर्दचे माजी सरपंच लक्ष्मण माताळे यांनी व्यक्त केले. या वेळी झाळण देवी ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: moving hospital in donaje gorhe budruk gorhe khurd