खासदार आढळराव यांनी घेतली उपोषणकर्ते कामगारांची भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

हडपसर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हडपसर येथील किर्लोस्कर न्युमेटिक कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या कामगारांच्या उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेतली. 

किर्लोस्कर न्युमेटिक कंपनीने अचानकपणे १३१ कामगारांना बडतर्फ केल्यानंतर हे सर्व कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले आहेत. कंपनीने युनियन समवेत चर्चा करावी अशी कामगारांची मागणी असून व्यवस्थापनाने मात्र ताठर भूमिका घेऊन कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर कामगार आयुक्त कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीलाही कंपनीने प्रतिसाद न दिल्याने कामगारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर खासदार आढळराव पाटील यांनी आज उपोषणाला बसलेल्या कामगाराची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना खासदार आढळराव पाटील म्हणाले की, मी स्वत: जातीने कंपनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करणार आहे. तसेच कामगार उपायुक्तांनी 30 ऑगस्टला बोलावलेल्या बैठकीला माझ्या वतीने प्रतिनिधी उपस्थित राहून कामगारांची बाजू मांडतील.

Web Title: MP Adhalrao meeting with Workers