पुण्यात सीएए, एनआरसी विरोधातील आंदोलनात देशविरोधी घोषणा?; खासदारांच्या मुलाची पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाबाहेर शनिवारी व रविवारी सायंकाळी काही संघटनांनी 'सीएए' व 'एनआरसी' विरुद्ध आंदोलन केले होते. 

पुणे : नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) व  राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास 'रात्र आंदोलन' करणाऱ्या संघटनाच्या कार्यकरत्यानी 'छिन के लेंगे आझादी' यासारख्या देशविरोधी घोषणाबाजी करीत हुल्लडबाजी केली. त्यामुले त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी तक्रार खासदार गिरीष बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी डेक्कन पोलिसांकडे दाखल केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाबाहेर शनिवारी व रविवारी सायंकाळी काही संघटनांनी 'सीएए' व 'एनआरसी' विरुद्ध आंदोलन केले होते. रविवारी मध्यरात्री एक वाजता संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरु होती. मात्र तेथे आंदोलन करणाऱ्या संघटनानी 'छिन के लेंगे आझादी' अशा घोषणा दिल्या. हुल्लडबाजी केली जात होती, त्यामुळे त्यांच्यावर कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करावी, असे गौरव बापट यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमुद केले.

वधुच्या आईला लग्नाचे फोटोसेशन पडले महागात; वाचा काय घडले?
 

याविषयी गौरव बापट म्हणाले, "आंदोलन करण्यास आमचा विरोध नाही. मात्र रविवारी मध्यरात्री तिथे "छिन के लेंगे आझादी" अशा स्वरुपाच्या देशविरोधी घोषणा दिल्या जात होत्या. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर सुरु होता. त्यांच्यावर कारवाई करा, असे सांगितले. पण पोलिसांनी एकले नाही. रात्रीच्या वेळी आंदोलनाला कशी परवानगी मिळते. या सर्व प्रकाराविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली आहे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Bapat son Gaurav Bapat file complaint for proclaiming anti-nationalist slogan While protest against CAA NRC