पुण्यातील कामासंदर्भात माजी नगरसेवकांना खासदार बापट यांचे पत्र

पुणे महापालिका बरखास्त झालेली असली तरी नागरिक बरखास्त झालेले नाहीत. शहरातील पाणी प्रश्‍नावर त्यांना दिलासा देणे ही आपली जबाबदारी आहे.
girish bapat
girish bapatsakal
Summary

पुणे महापालिका बरखास्त झालेली असली तरी नागरिक बरखास्त झालेले नाहीत. शहरातील पाणी प्रश्‍नावर त्यांना दिलासा देणे ही आपली जबाबदारी आहे.

पुणे - महापालिका (Pune Municipal) बरखास्त झालेली असली तरी नागरिक (Citizens) बरखास्त झालेले नाहीत. शहरातील पाणी प्रश्‍नावर (Water Issue) त्यांना दिलासा देणे ही आपली जबाबदारी (Responsibility) आहे. पुढच्या उन्हाळ्यापूर्वी या योजनेचे काम (Scheme Work) पूर्ण होणे अपेक्षीत आहे. त्यामुळे नगरसेवकांची (Corporator) मुदत संपलेली असली तरी समान पाणी पुरवठा योजनेचे काम आपल्या भागात वेगात करून घ्यावे असे आवाहन करणारे पत्र माजी नगरसेवकांना पाठविले आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी दिली.

समान पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी आज महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पुष्कर तुळजापूरकर, संजय मयेकर यावेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले, ‘समान पाणीपुरवठा योजनेचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण ८२ पैकी ३९ टाक्यांचे काम पूर्ण झाले, तर ३४ टाक्यांचे काम सुरू आहे. ९ ठिकाणी वन विभाग, संरक्षण किंवा कायदेशीर कारणांनी काम सुरू होऊ शकलेले नाही. १ हजार ३४५ किलोमीटर पैकी ६७४ किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. तर ५७ हजार ९४० जलमापक बसविण्यात आले आहेत. ही योजना पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना शुद्ध, पुरेसे पाणी मिळेल व वर्षाला ३ टीएमसी पाण्याची बचत होईल.

पाणी या विषयात राजकारण करणे योग्य नाही. महापालिकेचे पदाधिकाऱ्यांची, नगरसेवकांची मुदत संपलेली असली तरी त्यांनी पुणेकरांसाठी काम करणे अपेक्षीत आहे. हा प्रकल्प पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना मी पत्र पाठवले असून, जिथेजिथे या योजनेच्या कामात दिरंगाई होत असेल तिथेतिथे पक्षिय मतभेद विसरून अडथळे दूर करण्यासाठी मदत करा असे आवाहन केले आहे. ते त्यास प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे.

लोकप्रतिनिधींना घर आवश्‍यक

आमदारांना मुंबईत घर देण्याच्या निर्णयाबाबत खासदार बापट यांना विचारले असता, ते म्हणाले, आमदार निवास पाडले आहे, ते कधी पूर्ण होईल माहिती नाही. मुंबईमध्ये लोकप्रतिनिधींना घर आवश्‍यक आहे. ती घरे त्यांना मोफत व आलिशान नाहीत, तर म्हडामध्ये दिली जाणार आहे. पण या निर्णयाबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com