या खासदाराचे आठवड्यातील दोन दिवस मतदारसंघासाठी

kolhe1.
kolhe1.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती; नारायणगावला संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

नारायणगाव (पुणे) : ""लोकसभा निवडणुकीनंतर अधिवेशन, शिवस्वराज्य यात्रा, विधानसभा निवडणुकीचा प्रचार, यामुळे मतदारसंघासाठी वेळ देता आला नाही. मात्र जनतेने सांगितलेल्या कामात खंड पडू दिला नाही. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय काम करेल. लोकसभेच्या आगामी अधिवेशनानंतर दर गुरुवारी व शुक्रवारी मतदारसंघाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी उपलब्ध राहणार आहे,'' असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन कोल्हे यांच्या मातोश्री रंजनाताई कोल्हे, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी आमदार अशोक पवार, अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, तानाजी बेनके, गुलाबराव नेहरकर, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, रमेश भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, अंकुश आमले, विजय कुऱ्हाडे, राजश्री बोरकर, भाऊ कुंभार, देवराम मुंढे, दादाभाऊ बगाड, सुजित खैरे, सूरज वाजगे आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, ""ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आशीर्वाद व वळसे पाटील यांचे मार्गदर्शन, जनतेचा आशीर्वाद यामुळे मी बावीस दिवसांत खासदार झालो. हडपसर व नारायणगाव येथे हायटेक जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्या माध्यमातून जनतेचे प्रश्‍न थेट खासदारांपर्यंत पोचणार आहेत. ते सोडविण्यासाठी काम करेल.''

कार्यक्रमाचे नियोजन आशिष हांडे, राजेंद्र कोल्हे, अरविंद लंबे, गणेश वाजगे, आशिष वाजगे यांनी केले. रामदास अभंग यांनी सूत्रसंचालन केले. सत्यशील शेरकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com