'कॅंटोन्मेंट बोर्डांना अधिक विकास निधी द्या'

cantoment-board-committee
cantoment-board-committee

पुणे - देशभरातील कॅंटोन्मेंट बोर्डांच्या व्यवस्थापनांना अधिक विकास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी संरक्षणमंत्र्यांकडे येथे केली. कॅंटोन्मेंटच्या अखत्यारीत येणाऱ्या देशभरातील खासदारांची बैठक बोलवावी आणि कॅंटोन्मेंट हद्दीतील नागरी प्रश्नांची त्यात चर्चा करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

बापट व खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने संरक्षणमंत्री राजनाथसिंह व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतली. देहूरोड कॅंटोन्मेंटचा सुमारे २२५ कोटी रुपयांचा सेवा निधी केंद्राकडे थकीत आहे. ती रक्कम लवकर द्यावी, याकडे बापट यांनी या वेळी लक्ष वेधले. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, नगरसेवक राहुल बालघरे, विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारीमत्तू, गोपाळराव तंतरपाळे, अमोल नाईकनवरे उपस्थित होते. सर्व बोर्डांना जीएसटीचा वाटा देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

 देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराच्या बांधकाम आराखड्याला विशेष बाब म्हणून मंजुरी द्यावी, संरक्षण खात्याच्या मालकीच्या जमिनीवरील बोर्डाच्या शाळा व इतर मिळकतींचे हस्तांतर प्रस्ताव मंजूर करावेत, देहूरोड येथील डॉक्‍टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, मतदार यादीतून कमी केलेली नावे पुन्हा यादीत समाविष्ट करावीत, या मुद्द्यांवर या वेळी चर्चा झाल्याचे बापट यांनी पत्रकारांना सांगितले. बारणे यांनी यासंदर्भातील निवेदन मंत्र्यांना दिले. येत्या दोन दिवसांत संबंधित अधिकारी व देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष, नगरसेवक यांची बैठक बोलाविण्याचे आश्वासन नाईक यांनी दिल्याचे बापट यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com