राज्यकारभार फॅसिस्टांकडे - कुमार केतकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर समानतेच्या विचारांचा प्रभाव होता. अंधश्रद्धा, धार्मिक असहिष्णुता याविरोधात ते लढत होते. हिटलरच्या फॅसिस्टवादी विचारांमुळे जगाचे आतोनात नुकसान झाले. आजही भारतात याच विचारांवर राज्यकारभार चालवला जात आहे, अशी टीका खासदार कुमार केतकर यांनी केली.

पुणे - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर समानतेच्या विचारांचा प्रभाव होता. अंधश्रद्धा, धार्मिक असहिष्णुता याविरोधात ते लढत होते. हिटलरच्या फॅसिस्टवादी विचारांमुळे जगाचे आतोनात नुकसान झाले. आजही भारतात याच विचारांवर राज्यकारभार चालवला जात आहे, अशी टीका खासदार कुमार केतकर यांनी केली.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. अरुंधती खांडकर यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर लिहिलेल्या ‘स्वीमिंग अपस्ट्रीम’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी केतकर बोलत होते. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, लेखिका डॉ. अरुंधती खांडकर, डॉ. अशोक खांडकर, डॉ. ए. पी. देशपांडे, शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी, जे. बी. जोशी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एम. पठाण उपस्थित होते.

कुमार केतकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र हे तत्त्वज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान, कल्पनांचे नेतृत्व करणारे राज्य आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर भक्कमपणे ते उभारले आहे. लक्ष्मणशास्त्री जोशी हे ब्राह्मण म्हणून जन्माला आले असले, तरी त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध केला. ते अंधश्रद्धा आणि अस्पृश्‍य विचारसरणीच्या विरोधात उभे राहिले. त्यांचा आग्रह म्हणजे विज्ञानाच्या मूल्यांवर सर्व बाबी पडताळून पाहणे, असा होता. सध्या देशात फॅसिस्टवादी विचारसरणीचा बोलबाला आहे. नागरिकांना भ्रमित करून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जात आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Kumar Ketkar Talking Politics