दूध दराची घोषणा यशस्वी झाली नाही तर... : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

पुणे : दूध दरवाढीच्या आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेतले. दूध दराची घोषणा सरकारला यशस्वी करावीच लागेल, नाहीतर आम्हाला बंदोबस्त करावा लागेल, असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

हा प्रस्ताव कंपन्यांनी केलेला आहे, त्यामुळे अनुदान देताना त्यांना टक्केवारी द्यायला लागु नये, असेही त्यांनी सांगितले. सरकारने ऊस उत्पादक शेतकाऱ्यांचा विश्वासघात केला आहे. लोकसभेत मिठी मारु नाही तर मुका घेऊ, पण कमळ औषधाला शिल्लक राहणार नाही. अतिरिक्त दुधाचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता, पण आता अतिरिक्त दुधाला 5 रूपये अनुदान मिळणार असल्याने दर मिळण्यास अडचण येणार नाही. 

सरकारने ऊसाला किमान उत्पादन शुल्क (एफआरपी) देण्याची तयारी ठेवली नसेल तर संध्याकाळी निर्णय घेऊ, अशीही माहिती त्यांनी दिली. 

Web Title: mp raju shetty visits dagadusheth ganpati temple in pune