सारथी बचाव : खासदार छत्रपती संभाजीराजेंचे पुण्यात लाक्षणिक उपोषण सुरु

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

मराठा आणि कुणबी समाजातील असंख्य तरुण आणि विद्यार्थीही या उपोषणाला बसले आहेत. संस्थेवरील निर्बंध तातडीने उठवावेत, स्वायत्तता बहाल करावी आणि निर्बंध लादणाऱ्या सचिव जे. पी. गुप्ता यांना निलंबित करावे, अशी मागणी तरुण करीत आहे.

पुणे : ''मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांना दिशा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेची स्वायत्तता काढून घेतल्याच्या निषेधार्थ खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आगरकर रस्त्यावर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.

Video : 'सारथी बचाव'; छत्रपती संभाजीराजेंच्या हाकेला एकवटले मराठा तरुण

Image

मराठा आणि कुणबी समाजातील असंख्य तरुण आणि विद्यार्थीही या उपोषणाला बसले आहेत. संस्थेवरील निर्बंध तातडीने उठवावेत, स्वायत्तता बहाल करावी आणि निर्बंध लादणाऱ्या सचिव जे. पी. गुप्ता यांना निलंबित करावे, अशी मागणी तरुण करीत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

Imageसंस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे देखील उपोषणासाठी आले आहेत. ते म्हणाले, "सारथीच्या अस्तित्वाला हात लावण्याचा हेतू काय? कोण हे करीत आहे, हे अनाकलनीय आहे. आजपर्यंत कोणत्याही काम केले नाही, एवढी काम संस्थेने केले आहे. त्यात डी. आर. परिहार यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या प्रती मराठा समाजाने कृतज्ञ राहिले पाहिजे. आमच्यासारखे लोक इथे असताना संस्थेत भ्रष्टाचार होणे शक्य नाही."

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhaji Raje Protest to save Sarathi has started in Pune