Video : 'सारथी बचाव'; छत्रपती संभाजीराजेंच्या हाकेला एकवटले मराठा तरुण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 January 2020

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेवर शासनाने टाकलेले निर्बंध उठवावेत आणि सारथीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थकलेले विद्यावेतन सुरु करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत यांनी ही मागणी केली आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज पुण्यात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुुरु आहे

पुणे : महाराष्ट्र शासनाने 'सारथी' संस्थेची स्वायत्तता कायम ठेवावी या मागणीसाठी आज पुण्यातील सारथी संस्थेबाहेर थोड्याच वेळात खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह सर्व मराठा तरुण देखील एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. सारथी संस्थेच्या परिसरात मराठा, कुणबी समाजातील तरुणांची निदर्शने. जे. पी. गुप्ता हटाव, सारथी बचाव जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.

Video:मेंदूतील गाठीने हिरावले पीएसआय होण्याचे स्वप्न; हवाय मदतीचा हात

Image

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेवर शासनाने टाकलेले निर्बंध उठवावेत आणि सारथीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थकलेले विद्यावेतन सुरु करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.
पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत यांनी ही मागणी केली आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज पुण्यात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुुरु आहे. 'सारथी संस्था वाचवा आंदोलनाला सुरवात झाली असून राज्यातून अनेक तरुण सहभागी झाले आहे.

सदोष सेवेबद्दल तुरुंगाची हवा

दरम्यान, या उपोषणात खासदार छत्रपती संभाजीराजे, डॉ. सदानंद मोरे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, सकल मराठा क्रांती मोर्चा, राज्यातील सारथीचा लाभ घेणारे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Image

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राष्ट्रपती राजवटीच्या काळात या संस्थेवर ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी संस्थेवर निर्बंध घातले आहेत. ते निर्बध उठवावेत आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर विद्यावेतन मिळावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे. तसेच जे .पी. गुप्ता यांना निलंबित करावे, अशीही त्यांची मागणी आहे. सारथीवरील निर्बंध हटवल्याचे शासन परिपत्रक काढावे, असे आवाहनही सरकारला यावेळी करण्यात आले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhaji Raje will do Protest for Sarathi in Pune