Vidhan Sabha 2019 : सिद्धार्थ शिरोळेंसाठी खासदार काकडे उतरले मैदानात!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

संपूर्ण मतदारसंघातील वेगवेगळे मेळावे, पदयात्रा, प्रचार फेऱ्यांचे आयोजन आणि प्रचाराची सगळी यंत्रणा चोख ठेवण्याकडे काकडेंचे विशेष लक्ष आहे.

पुणे : शिवाजीनगर मतदारसंघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये सध्या खासदार संजय काकडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारामध्ये गेल्या पंधरवड्यापासून खासदार काकडेंनी बारकाईने लक्ष घातले आहे.

- Vidhan Sabha 2019 : आयत्या बिळात चंदूबा; राष्ट्रवादीचे सोशल मीडियावर अस्सल मराठी कॅम्पेन

संपूर्ण मतदारसंघातील वेगवेगळे मेळावे, पदयात्रा, प्रचार फेऱ्यांचे आयोजन आणि प्रचाराची सगळी यंत्रणा चोख ठेवण्याकडे काकडेंचे विशेष लक्ष आहे. बुधवारी (ता.16) सायंकाळी काकडेंच्या हस्ते आनंद छाजेड यांच्या निवडणूक कार्यालयाचे बोपोडीत उद्घाटन झाले आणि त्यानंतर भव्य पदयात्रा पार पडली.

- Vidhan Sabha 2019 : माझ्यापेक्षा कोथरूडकरांचा विजय महत्त्वाचा : शिंदे

Image may contain: 5 people, people smiling

या पदयात्रेत सिद्धार्थ शिरोळेंसोबत संजय काकडेही सहभागी झाले होते. या वेळी नगरसेवक दुर्योधन भापकर, अभय सावंत, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, मधुकर मुसळे, उत्तम बहिरट, ओंकार कदम, विजय शेवाळे, कैलास टोणपे, मनीष बासू, चंद्रकांत मोरे हे पदाधिकारी उपस्थित होते.

- Vidha Sabha 2019 : शरद पवार, सोनिया गांधी, राज ठाकरेंविषयी सोशल मिडीयावर बदनामीकारक मजकूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sanjay Kakade met voters to promote Siddharth Shirole for Vidhan sabha 2019