सुप्रिया सुळेंचा पतीसह जेजुरीत 'जय मल्हार'चा घोष

Supriya sule
Supriya sule

जेजुरी : श्री मार्तंड देवस्थान जेजुरी येथे आज (ता. 4) महाशिवरात्रीच्या पर्वणीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पती उद्योजक सदानंद सुळे यांनी आज जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार सुप्रिया सुुळे यांंना उचलून घेत मंदिराच्या काही पायऱ्या चढल्या. 

महाशिवरात्रीला गडावरील दोन्ही शिवलिंग दर्शनासाठी खुले असतात. आज सुप्रिया सुळेंनी व उद्योजक सदानंद सुळे यानी दर्शन घेतले तसेच उपस्थीत भविकांबरोबर सेल्फीही घेतले.

महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्य मंदिरातील तळघरात असलेले गुप्त शिवलिंग तसेच कळसावरील शिवलिंगाचे दर्शन घेता येते. यासाठी राज्यभरातून भाविक जेजुरीला येतात. नऊ लाख पायऱ्यांचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगराच्या दोनशे पायऱ्या चढून गेल्यानंतर मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवविवाहित जोडपी दर्शनाला जात असताना पतिदेव नववधूस उचलून घेतो.

यंदा लग्नाला 28 वर्षे पूर्ण होत असताना, दर्शनास जाताना सदानंद सुळे यांनी खासदार सुप्रिया सुुळे यांंना उचलून घेत मंदिराच्या काही पायऱ्या चढल्या. लग्नाच्या नव्या नव्हाळीचे काही अनुभव ताजे केले. राज्यात भरपूर पाऊस पडू दे, बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे असे साकडे यावेळी खासदार सुळे यानी खंडोबाला घातले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com