खासदार सुप्रिया सुळे यांनी केले वृक्षारोपण....

राजकुमार थोरात 
बुधवार, 27 जून 2018

वालचंदनगर : वृक्षवल्ली आम्हा सोयरी...या उक्तीप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यामध्ये वडाच्या झाडांची लागवड करुन वृक्ष वाचविण्याचा संदेश दिला. आज बुधवार (ता. 27) बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर तालुक्यातील 13 गावामध्ये नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी दौरा आयोजित केला होता. 

आज वटपौर्णिमेचा सण आहे. या दिवशी महिला वडाच्या झाडांची पुजा करुन झाडाला फेरे मारत असतात. खासदार सुप्रिया सुळे यांनी वटपौर्णिच्या दिवशी दौऱ्यामध्ये असेलेल्या डाळज व काळेवाडी गावामध्ये वडाच्या झाडांचे वृक्षारोपन वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.

प्रवीण माने यांचे अपेक्षा दहापट जास्त काम - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील दौऱ्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांचे कौतुक केले. यावेळी सुळे यांनी सांगितले की, प्रवीण माने यांचे इंदापूर तालुक्यामध्ये बारीक लक्ष आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पडात असून अपेक्षापेक्षा दहा पट जास्त काम करीत असून नागरिकांच्या अडीअडचणीसाठी चोवीस तास उपलब्ध आहेत. तालुक्याबरोबर जिल्हामध्ये त्यांचे चांगले काम असल्याबद्दल कौतुक केले.

Web Title: MP Supriya Sule has planted trees