खासदार सुप्रिया सुळे यांना प्राईम पॉईंट फाउंडेशनचा संसद महारत्न पुरस्कार 

खासदार सुप्रिया सुळे यांना प्राईम पॉईंट फाउंडेशनचा संसद महारत्न पुरस्कार 

बारामती : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि इ- मॅगझिनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शनिवारी (ता. 20) प्रदान करण्यात येणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संसद महारत्न पुरस्काराबरोबरच सुप्रिया सुळे यांना विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती आणि चर्चेतील सहभागासाठी सलग सहाव्यांदा जाहीर झालेला संसदरत्न पुरस्कारही याच कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. गत सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात 96 टक्के उपस्थिती लावत 152 चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण 1186 प्रश्न उपस्थित केले, तर 22 खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फाऊंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

याबरोबरच चालू सतराव्या लोकसभेतही सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून, त्यांनी 89 टक्के उपस्थिती लावत 122 चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात एकूण 286 प्रश्न त्यांनी विचारले असून चार खासगी विधेयके मांडली आहेत. या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com