सुप्रिया सुळेंनी शेअर केला 'जुना' फोटो; सोशल मीडियावर 'धुराळा'

सागर दिलीपराव शेलार
Wednesday, 9 September 2020

देशावर किंवा महाराष्ट्रावर संकट आले की ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमी धावून येतात, हे अनेकदा देशाने, राज्याने अनुभवले आहे. सध्या महारष्ट्रात माजी दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबर काम केलेले ते एकमेव नेते आहेत. 

पुणे : बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. दोन दिवसांपुर्वीच त्यांनी आपला मुलगा विजय सुळे फोरव्हिलर ट्राईव्ह करत आपले आजोबा म्हणजेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना घेऊन जात असतानाचा व्हिडिओ फेसबुकवर लाईव्ह केला होता. कालच त्यांनी स्वीगीच्या एका महिलेचा व्हिडिओ लाईव्ह केला होता. त्याचप्रमाणे टपाल विभागात काम करणाऱ्या एका महिलेचाही व्हिडिओ त्यांनी लाईव्ह केला होता. आता आज त्यांनी फेसबुकवर पवार साहेब यांचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. त्यावर अक्षरश: लाईक व काॅमेन्टचा पाऊस पडत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशावर किंवा महाराष्ट्रावर संकट आले की ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमी धावून येतात, हे अनेकदा देशाने, राज्याने अनुभवले आहे. सध्या महारष्ट्रात माजी दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबर काम केलेले ते एकमेव नेते आहेत. 

Image may contain: 1 person, text

आज 80 व्य़ा वर्षी देखील पवार हे राज्यातील जनतेवर कुठलेही संकट आले की ठामपणे जनतेच्या पाठीशी उभे राहतात. मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योजकांच्या समस्या, कामगार, मजूर, महिला, व्यापारी, व्यावसायिक असे सर्वांचेच प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. किंबहुना या सर्वच घटकांना साहेबांचा नेहमी आधार वाटत आला आहे. म्हणून तर साहेबांच्या भोवती सतत लोकांची गर्दी पाहायला मिळते. 

पुण्यात ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने केली सुरुवात

देश किंवा राज्यातील प्रत्येक संकटाच्या वेळी शरद पवार यांनी निर्णायक भूमिका पार पाडली आहे. म्हणून तर केंद्रात, राज्यात सरकार कोणाचंही असो प्रत्येक संकटात त्या-त्या सरकारनेही साहेबांची मदत घेतली आहे. मार्गदर्शन घेतले आहे. अनेक नेते व कार्यकर्ते फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतात. त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील सर्वांनाच आदर आहे. अनेक जण त्यांच्यासोबतचे क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातच त्यांचा मोठा आनंद सामावलेला असतो.

खासदार सुळे या नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी आज आपल्या फेसबुक पेजवर पवार यांचा शालेय जीवनातील एक फोटो शेअर केला आहे. त्यांच्या फॅमिलीमधील सदस्यांना सोडता इतरांना हा फोटो कोणाचा आहे ओळखणे जरा अवघडच आहे. पण शरद पवार यांच्या निष्ठावान असणाऱ्यांना हा फोटो कोणाचा आहे हे लगेच समजते आहे. या फोटोचीच सध्या सोशल मिडियामध्ये जोरदार चर्चा आहे. या फोटोने सोशल मीडियावर धुरळा उडवून दिला आहे. 

अरे बापरे! भंगारातून पुणे विद्यापीठाने केली तब्बल एवढी कमाई

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp supriya sule sharing a photo on social media