खासदार सुळेंनी सोडविल्या बेलवाडीकरांच्या अडचणी

 राजकुमार थोरात
गुरुवार, 5 जुलै 2018

वालचंदनगर (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे यांनी बेलवाडी (ता.इंदापूर) गावातील  ग्रामपंचायत पदाधिकारी,  ग्रामस्थ व शासकीय अधिकाऱ्यांचा मेळ घालून येथील गेल्या दहा महिन्यापासुन रखडलेले अनेक प्रश्‍न गावदौरा बैठकीमध्ये मार्गी लावले.

वालचंदनगर (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे यांनी बेलवाडी (ता.इंदापूर) गावातील  ग्रामपंचायत पदाधिकारी,  ग्रामस्थ व शासकीय अधिकाऱ्यांचा मेळ घालून येथील गेल्या दहा महिन्यापासुन रखडलेले अनेक प्रश्‍न गावदौरा बैठकीमध्ये मार्गी लावले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवार  (ता.३) रोजी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील गावामध्ये गावदौरे करुन गावातील अडचणी समाजावून घेवून सोडविण्याचा प्रयत्न केला.  ऑक्टोबर २०१७  मध्ये बेलवाडी ग्रामपंचायतीची पंचावार्षिक निवडणूक झाली आहे. निवडणूकीनंतर ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे नवीन पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय नसल्याने गावतील नागरिकांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निवडणूका होवून दहा महिने झाले तरीही सरपंचाला आर्थीक  अधिकार मिळाले नाहीत, गावातील शौचालयाच्या अनुदानाचे सात लाख रुपयांचे धनादेश वितरण रखडले आहे. विविध फंडातुन निधी मंजूर होवून ही विकासकामे ठप्प अाहेत.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दहा-बारा दिवसावरती आला असून पालखी तळावरील कामे सुरु झाली नसल्याने  छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, विद्यमान संचालक सर्जेराव जामदार, सरपंच  माणिक जामदार व शुभम निंबाळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढे तक्रारीचा पाढा वाचला.   खासदारासमोरच अतिरिक्त गटविकासधिकारी विनायक गुळवे, विस्तारधिकारी किरण मोरे व ग्रामस्थांमध्ये  खडाजंगी सुरु झाली. सुळे यांनी ग्रामस्थ व अधिकाऱ्यांचे ऐकून त्याच्यावर योग्य समन्वयाने योग्य तोडगा काढला.  पालखी तळाच्या कामांना तातडीने सुरवात करण्याच्या सुचना देवून १९ जुलै रोजी शौचालयाचे अनुदानाचे धनादेश, व सरपंचाचे अधिकारी देण्याच्या सुचना केल्या.

१९ जुलै सुळे दिल्लीमध्ये पार्लेमेंटच्या बैठकीमध्ये असणार असून बेलवाडीच्या  कामांचा आढावा घेण्यासाठी  फोन करणार असल्याचे सांगितले.  खासदार सुळे यांनी प्रशासन व ग्रामस्थांचा मेळ घालून कामे चुटकीशी मार्गी लावली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषदचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे,उपसभापती यशवंत माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष  अमरसिंह घाेलप, माजी झेडपी सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, रेहना  मुलाणी,सचिन सपकळ  उपस्थित होते.

डोक्यावर बर्फ व ताेंडात साखर ठेवा...
कोणताही प्रश्‍न साेडवायचे असेल तर समन्वयाने सुटू शकतो. त्यासाठी भांडत बसण्याची गरज नाही. अधिकारी व ग्रामस्थांना तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेवल्यास चुटकीशी कार्मी लागतील असे सांगितले.यावेळी बेलवाडीच्या ग्रामस्थांनी खासदार सुळे समोर आमच्या गावात मुरुम टाकला जात नाही अशी कामे ही सांगण्यास सुरवात केल्यानंतर सुळे यांनी देशापेक्षा बेलवाडीचे विषय महत्वाचे असून मी  ग्रामसभेला येत असे सांगितल्याने बैठकीमध्ये हशा पिकाला.

Web Title: mp supriya sule solves problem of belwadi citizens