बाळासाहेबांच्या संस्कारामुळेच आज भाऊ भावाच्या पाठिशी : खा. सुप्रिया सुळे

MP Supriya Sule speaks on Raj Thackeray ED inquiry
MP Supriya Sule speaks on Raj Thackeray ED inquiry

पुणे : 'ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उचलतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे,' असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 

अशा काळात आपला परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे राज ठाकरे यांचा परिवार सोबत गेला तर कोणी टीका करू नये. बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जीवंत आहेत यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली, असेही सुळे यांनी यावेळी सांगितले. 

राज ठाकरे सकाळी अकराच्या सुमारास कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानाकडून ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. त्यांची पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, पुत्र अमित, सून मितालीही राज यांच्यासोबत होते. ईडी कार्यालयापासून काही अंतरावर सर्वांच्या गाड्या थांबवण्यात आल्या. त्यानंतर राज ईडी कार्यालयात गेले. त्यांचे कुटुंबिय बेलार्ड पिअर येथे ईडी कार्यालयापासून जवळच असलेल्या ग्रँड हॉटेलकडे रवाना झाले. 

राज यांचे पार्टनर उन्मेष जोशी यांची चौकशी आठ तासांहून अधिक काळ चालली होती. त्यामुळे राज यांच्या चौकशीलाही वेळ लागू शकतो. तेव्हा शर्मिला ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com