ओढा खोलीकरणाचा रोटरी क्लबचा उपक्रम स्तुत्य - खा. सुळे

प्रा. प्रशांत चवरे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मदनवाडी (ता. इंदापुर) येथे रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या ओढा खोलीकरणाच्या कामास भेट देऊन पाहणी केली.

भिगवण - मदनवाडी येथील ओढा खोलीकरणाच्या माध्यमातून गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होण्यास मदत होणार आहे व गाव दुष्काळमुक्त होण्यास निश्चित मदत होईल. जलसंधारणाच्या कामामध्ये रोटरी क्लबसारख्या सामाजिक संस्था पुढे येत आहेत ही आनंदाची बाब आहे. मदनवाडी येथे सुमारे पन्नास लाख रुपये खर्चुन करण्यात येत असलेला ओढा खोलीकरणाचा उपक्रम स्तुत्य आहे असे मत बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
    
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मदनवाडी (ता. इंदापुर) येथे रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या ओढा खोलीकरणाच्या कामास भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, रोटरी क्लब ऑफ भिगवणचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, माजी अध्यक्ष रियाज शेख, उपाध्यक्ष संपत बंडगर, प्रदीप वाकसे, डॉ. अमोल खानावरे, अमर शहाणे, गणेश राक्षे उपस्थित होते. सचिन बोगावत म्हणाले, रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोठ्या प्रकल्पापैंकी मदनवाडी येथील ओढा खोलीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी रोटरी क्लबच्या वतीने पन्नास लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहीती दिली. खासदार सुळे यांनी झालेल्या कामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: MP Supriya Sule Talks On Rotary Clubs Praise commends