भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटांमध्ये खासदार सुळे यांचा दौरा

प्रशांत चवरे
बुधवार, 18 एप्रिल 2018

भिगवण (पुणे) : भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटांमधील गावांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी व ग्रामस्थांची संवाद साधण्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुऴे व इंदापुर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा संयुक्त गाव भेट दौरा गुरुवारी (ता.19) आयोजित करण्यात आला असल्याची माहीती इंदापुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष महारुद्र पाटील व भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी दिली आहे.

भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील गांव भेट दौऱ्यास गुरुवारी (ता.19) सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे. सकाळी 10.वा. लामजेवाडी, 11.00 वा. म्हसोबाचीवाडी, 12.00 वा. काझड, 1.00. वा. शिंदेवाडी, 2.00 वा. निंबोडी, 3.00 वा. लाकडी, 4.00 वा. अकोले, 5.00 वा. कुंभारगांव, 5.30 वा. पोंधवडी, 6.00वा. मदनवाडी असे दौऱ्याचे स्वरुप असणार आहे. गांव भेट दौऱ्यांच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे हे गावाच्या समस्या जाणुन घेणार असुन ग्रामस्थांशी हितगुज करणार आहेत तरी खासदार सुळे व आमदार भरणे यांचे गावभेट कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन इंदापुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: mp supriya sule visit to bhigwan shetfalgadhe