Corona Virus : 'एमपीएससी'च्या परीक्षा पुढे ढकलल्या

MPSC exam postponed due to coronavirus
MPSC exam postponed due to coronavirus

पुणे : 'कोरोना'चा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रिल व मे महिन्यात होऊ घातलेल्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. पुढील तारीख लवकरच कळवली जाईल असे स्पष्ट केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
'एमपीएससी'ने २२ मार्च रोजी परिपत्रक काढून 'राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०' २६ एप्रिल रोजी तर 'महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२०' ही १० मे रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. राज्यात 'कोरोना' रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लाॅकडाऊनचा कालावधी वाढविला जाण्याची शक्यता अाहे. त्यामुळे 'एमपीएससी'ने या परीक्षा स्थगीत केल्या आहेत. 

Coronavirus : महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव
परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक 'एमपीएससी'च्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. तसेच अर्ज भरलेल्या उमेदवारांना एसएमएसद्वारे याबाबत माहिती दिली जाईल, असे 'एमपीएससी'ने स्पष्ट केले आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com