मुख्यमंत्र्यांना टोपी घालतंय कोण? पुण्यात झळकले फ्लेक्स

ब्रिजमोहन पाटील
Monday, 31 August 2020

महाराष्ट्र सरकारने नुकतीच एम पी एस सी परीक्षा पुढे ढकली आहे. त्याचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी टिळक चौक, टिळक स्मारक मंदिर समोर, डेक्कन जिमखाना, वडगाव शेरी येथे फ्लेक्स लावले आहेत. या होर्डिंग मध्ये 'पवार' फुल युवा नेते असा उल्लेखही करण्यात आला असून, या नेत्याचा खाजगी क्लास चालकांवर आशीर्वाद असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या होर्डिंगच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

पुणे : पुण्यात नगरसेवक हरवले आहेत, कसब्यात बदल हवा का ? असे फ्लेक्स लावल्याच्या घटनांनी राजकारण ढवळून निघाले होते. मात्र आता पुण्यात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोपी घालतय कोण? परीक्षा रद्द... क्लास चालू... अशा आशयाचे मोठेच्या मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने यावर प्रश्न उपस्थित करत एका युवा नेत्याने खासगी क्लास चालकांसाठी खटाटोप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम

महाराष्ट्र सरकारने नुकतीच एम पी एस सी परीक्षा पुढे ढकली आहे. त्याचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी टिळक चौक, टिळक स्मारक मंदिर समोर, डेक्कन जिमखाना, वडगाव शेरी येथे फ्लेक्स लावले आहेत. या होर्डिंग मध्ये 'पवार' फुल युवा नेते असा उल्लेखही करण्यात आला असून, या नेत्याचा खाजगी क्लास चालकांवर आशीर्वाद असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या होर्डिंगच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

Image may contain: text that says "मुख्यमंत्र्यांना टोपी घालतंय कोण? परीक्षा रद्द... क्लास चालू... प्रामाणिक विद्यार्थी.. कंपनीचे CEO, मालक, "सायेब तुम्ही आम्ही मात्र देऊन, अधिकारी माउपाशीमहतोयMPय होऊद्या आई बापाचं स्वप्न पूर्ण करु द्या खाजगीक्लासेस खाजगी 深月看团 'पवार' फुल युवानेते VIPTT.TO कल्पेश चंद्रकांत यादव 9623337777 पुणे शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वेद्याथी सेना."

कल्पेश यादव म्हणाले, ''राज्य सरकारच्या  या निर्णयाने असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. परीक्षा पुढे ढकली पण मुख्यमंत्र्यांनी परीक्षा कधी होणार ? याचे उत्तर मात्र दिले नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपत असल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. आयोगाने विद्यार्थ्यांच्या आरोगायला केंद्र बिंदू ठेवून परीक्षा घेण्यासाठी तयारी देखील केली होती. त्यामुळे असंख्य विद्यार्थी परीक्षेसाठी पुणे शहरात दाखल झाले होते, या विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक, मानसिक पिळवणूक याचा विचार सरकारने करायला नको का?

करु का अजितदादांना फोन; प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण

काही राजकीय घरातील युवा नेते एका बाजूला स्पर्धा परीक्षेचे खाजगी क्लास चालू करण्याची मागणी करतात आणि दुसरीकडे परीक्षा पूढे ढकलण्याची मागणी करतात. यातून या नेत्यांचा क्लास चालकांवर असणारा वरदहस्त स्पष्ट दिसतो आहे. विद्यार्थ्यांची तळमळ, आर्थिक अडचणअडचण व भविष्याची चिंता याकडे  लक्ष वेधण्यासाठी हे फ्लेक्स लावले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC exam postponed pune vs rakesh yadav banner cm uddhav Thackeray