MPSC Andolan : शरद पवार आंदोलकांच्या भेटीला

नव्या अभ्यासक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद
MPSC Andolan
MPSC Andolansakal

Pune News- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे बालगंधर्व चौकात आंदोलन सुरू असताना,

आज रात्री अकराच्या सुमारास अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी भेट घेतली.

हजारोंच्या संख्येमध्ये विद्यार्थी उपस्थित असताना या गर्दीमध्ये शरद पवार घुसले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. या वेळी परिसर टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेला.

अचानक बदललेल्या अभ्यासक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने याची अंमलबजावणी २०२५ पासून केली जावी,

अशी मागणी अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांची आहे. या विरोधात यापूर्वी दोन वेळा आंदोलने झालेली असताना एमपीएससीने निर्णय बदलले नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आयोगाकडे या संदर्भात विनंती केली. त्यानंतरही आयोगाची भूमिका ठाम आहे.

MPSC Andolan
MPSC Andolan Pune : Satyajeet Tambe विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात

आयोगाकडून निर्णय बदलला जात नसल्याने दोन दिवसांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बालगंधर्व चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे.

मंगळवारी रात्री अकरा वाजता पवार घटनास्थळी दाखल झाले. पवार येणार याची माहिती विद्यार्थ्यांना लागतात चौकात प्रचंड गर्दी झाली. या वेळी ‘एकच साहेब पवार साहेब’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

पवार म्हणाले, ‘‘अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करावी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक आयोजित केली जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मी उपस्थित असेल.’’

आंदोलनाच्या ठिकाणावरून शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून या संदर्भात चर्चा केली. शिंदे यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. ही घोषणा पवार यांनी करताच विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून तसेच मोबाईलची टॉर्च लावून याचे स्वागत केले.

MPSC Andolan
"जिथे बापटांना सोडलं नाही तिथं..."; सुषमा अंधारेंची MPSC विद्यार्थी आंदोलनावरून भाजपवर टीका

उपोषण मागे नाही

शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उद्या त्यांच्यासोबत बैठक आयोजित केलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

मात्र, आम्ही आंदोलन व उपोषण मागे घेतलेले नाही, अशी माहिती आंदोलक अक्षय जैन, प्रथमेश आबनावे, शिवराज मोरे, नितीन आंधळे, राहुल शिकसाट, प्रशांत बाहेती यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com