एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर 

एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर 

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2019 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करणे सोयीस्कर होणार आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्वपरीक्षा 17 फेब्रुवारीला, तर मुख्य परीक्षा 13 ते 15 जुलैदरम्यान होणार आहे. 

''आयोगाकडून दोन वर्षांपासून साधारणत: 21 नोव्हेंबरला  पुढील वर्षी होणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र, 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असल्यामुळे परीक्षार्थींना अभ्यासाचे नियोजन करता यावे, यासाठी आयोगाने नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाच वेळापत्रक जाहीर केले आहे,'' असे आयोगाचे उपसचिव सुनील औताडे यांनी सांगितले. परीक्षेमार्फत होणारी पद भरती, संख्येबाबतचा तपशील आणि अन्य माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक : 2019 
- परीक्षेचे नाव : पूर्व परीक्षा : मुख्य परीक्षा 
- सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा : 19 जानेवारी 
- राज्य सेवा परीक्षा : 17 फेब्रुवारी : 13, 14, 15 जुलै 
- महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : 24 मार्च 
- पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा : 31 मार्च : 7 जुलै 
- सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा : 28 एप्रिल : 1 सप्टेंबर 
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा : 19 मे : 29 सप्टेंबर 
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा : 26 मे : 15 सप्टेंबर 
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : 16 जून 
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : 23 जून 
- सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा  : 1 डिसेंबर 
- राज्य कर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा : 8 डिसेंबर 
- महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा : 15 डिसेंबर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com