लघुपटातून निर्भीडपणे आशय मांडावा - कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पुणे - 'आज जिथे तिथे अभिव्यक्तीवर जो अंकुश ठेवला जाण्याचा प्रकार घडत आहे, तो पाहता एखाद्या कलाकाराला आपल्या कलेतून स्वतःला हवा असलेला आशय जसा हवा तसा लोकांपर्यंत पोचवणे सोपे राहिलेले नाही. अशा वेळी, लघुपट हे माध्यम त्यावर असणाऱ्या कमीत कमी अंकुशामुळे महत्त्वाचे ठरते. हे माध्यम वापरून कलाकारांनी निर्भीडपणे आपला आशय लोकांपर्यंत पोचवायला हवा,'' असे परखड मत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी येथे व्यक्त केले.

"सिनेमास्कोप' आयोजित लघुपट महोत्सवाच्या अंतिम फेरीनंतरच्या सोहळ्यात कुलकर्णी तसेच दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांना शुक्रवारी "प्राइड ऑफ पुणे' सन्मानाने गौरविण्यात आले. या वेळी चित्रपट अभ्यासक समर नखाते, रेणू देसाई, विशाल गोखले, प्रतिभा सीरिया, विनीत देव आदी उपस्थित होते. "पॉझी व्ह्यू' तसेच गोखले कन्स्ट्रक्‍शन्सच्या सहयोगाने आयोजित या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक "सकाळ' होते.

कुलकर्णी म्हणाल्या, 'चित्रपट, मालिका किंवा लघुपट बनवणे एकवेळ सोपे, पण त्याचे वितरण मात्र आव्हानात्मक काम असते. वितरणासाठी अनेकदा मोठ्या समस्यांचा सामना निर्माते-दिग्दर्शकांना करावा लागतो. अशा काळात वितरण अधिक सुकर करणाऱ्या संस्थांची गरज आहे.''
कला पोचवणे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच महत्त्वाचे ठरते त्याचा आशय पोचवणे, असेही त्या म्हणाल्या.

हवा मुक्ततेचा पुरस्कार
उमेश कुलकर्णी म्हणाले, ""हवं ते मोकळेपणाने मांडण्यासाठीचे लघुपट अत्यंत प्रभावी माध्यम आहे. जगभरात ज्या शॉर्ट फिल्म्स बनत आहेत, ते पाहिलं की थक्क व्हायला होतं. अनेक गोष्टी ते कलेच्या द्वारे करू पाहत आहेत. कलाकारांना जे काही मांडायचे आहे, ते मुक्तपणे मांडता आले, तर ते खरे सामाजिक प्रगतीचे लक्षण ठरते.''

यांना मिळाली पारितोषिके :
- बलुतं : सर्वोत्तम कॅमेरा
अ मिलियन थिंग्स : सर्वोत्तम दिग्दर्शन
इरुमल थाथा : बेस्ट कॉन्सेप्ट

सर्वोत्तम 3 लघुपट :
1- अ मिलियन थिंग्स
2- बलुतं
3- द बोहेमीयन म्युझिशियन

Web Title: mrunal kulkarni talking