औद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून "अभय योजना' जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. 

राज्यात 97 हजार 464 औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेद्वारे या ग्राहकांना सुमारे 231 कोटींचे व्याज व विलंब आकारावरील सवलत मिळवता येणार आहे. 

राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. अशा ग्राहकांसाठी महावितरणने 1 जून 2018 ते 31 ऑगस्ट 2018 या तीन महिन्यांसाठी "अभय योजना' जाहीर केली आहे. ज्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा 31 डिसेंबर 2017 पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना 100 टक्के व्याजमाफी व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. 1 जुलै 2018 ते 31 ऑगस्ट 2018 या दरम्यान ग्राहकाने मूळ थकबाकीची रक्कम व व्याजाची 25 टक्के रक्कम भरली, तर उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची माफी ग्राहकाला मिळणार आहे. 

तसेच न्यायालयीन प्रकरण 12 वर्षांपेक्षा अधिकचे असेल व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल, तर संबंधित ग्राहकांनी डिक्रीची रक्कम एकाच वेळी पूर्ण भरल्यास त्या ग्राहकाला 100 टक्के व्याजाची माफी मिळणार आहे. तसेच जे न्यायालयीन प्रकरण 12 वर्षांपर्यंतचे आहे व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली आहे, अशा ग्राहकांनी एका टप्प्यात डिक्रीची रक्कम भरल्यास त्यांना 50 टक्के व्याजमाफीची सूट मिळणार आहे. या सर्व प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च संबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे. 

थकबाकी भरा, वीजजोड घ्या ! 
थकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल. या योजनेत ज्या ग्राहकाला आपल्या थकबाकीच्या रकमेची माहिती घ्यावयाची आहे, अशांनी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील AMNESTY SCHEME 2028 या लिंकवर जाऊन ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाकल्यास या योजनेची व ग्राहकाच्या थकबाकीची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. या योजनेत 1 जून 2018 पासून ग्राहकांना सहभागी होता येईल. जास्तीत जास्त औद्योगिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: MSEB Abhay scheme industrial customers