पिंपरी : भोसरीमध्ये फोन करण्यासह व्हॉट्सऍपवर मेसेज केल्याने महिलेसह तिच्या पतीने व भावाने महावितरण कंपनीच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी विक्रांत माधव वरुडे (रा. तुकाईनगर, दिघी रोड, भोसरी) या अधिकाऱ्याने फिर्याद दिली. त्यानुसार वैशाली भालेकर, तिचा पती व भाऊ ज्ञानेश्वर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
वरुडे हे महावितरण कंपनीत सहायक अभियंता म्हणून नोकरीला आहेत. शुक्रवारी (ता. 6) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ते थरमॅक्स चौकातील आकुर्डी उपविभाग कार्यालयात होते. त्या वेळी भालेकर व जाधव कार्यालयात आले. "माझ्या बायकोला फोन व व्हॉट्सऍप मेसेज का करतो', असे म्हणत वरुडे यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच, त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून मोशीतील कार्यालयात आणले. तेथे वैशाली भालेकर यांनी वरुडे यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपी हे वरुडे यांच्या घरी घेऊन गेले. तेथे त्यांच्या आई व वहिनीसमोर पुन्हा त्यांना शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.