विद्युत लेखापालांचा महावितरणला झटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

पुणे - वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार शेतकऱ्याने करूनदेखील त्यांची दखल न घेणाऱ्या महावितरणला विद्युत लेखापालांनी चांगलाच झटका दिला. तक्रार दाखल केल्यानंतर १८ तासांत तक्रारीचे निवारण न केल्यामुळे संबंधित शेतकऱ्याला २४ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. एवढेच नव्हे, तर शेतकऱ्याला स्वत:च्या खर्चाने टाकायला लावलेल्या केबलचे पैसेही परत करण्याचे आदेश  दिले आहेत.

देहू येथील शेतकरी शरद महादू काळोखे यांनी या संदर्भात विद्युत लोकपालांकडे तक्रार दिली होती. वीजपुरवठा खंडित झाल्याबद्दल त्यांनी महावितरणकडे गेल्या जानेवारीत ऑनलाइन तक्रार दिली होती. नियमानुसार १८ तासांत या तक्रारीचे निवारण होणे अपेक्षित होते. मात्र या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे काळोखे यांनी महावितरणच्या अंतर्गत तक्रार मंच आणि ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे अर्ज दाखल केला. त्यानंतर मार्चमध्ये वीजपुरवठा सुरळीत  करण्यात आला.

Web Title: MSEDCL compensation of Rs. 24 thousand to the farmer