शेतकऱ्यांनो, आता महावितरण 'हे' कृषीपंप दुरूस्त करून देणार, तेही फ्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

सध्या राज्यात वादळी पाऊस व गारपिटीचा धोका आहे. त्यामध्ये सौर कृषीपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त होण्याची शक्‍यता आहे. नादुरुस्त झालेले सौर कृषीपंप नियमानुसार मोफत दुरुस्त करण्याचे किंवा बदलून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. 

पुणे : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतील तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौर कृषीपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस, गारपिट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत दुरुस्त करून अथवा बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या राज्यात वादळी पाऊस व गारपिटीचा धोका आहे. त्यामध्ये सौर कृषीपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त होण्याची शक्‍यता आहे. नादुरुस्त झालेले सौर कृषीपंप नियमानुसार मोफत दुरुस्त करण्याचे किंवा बदलून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा तसेच शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेनुसार पहिल्या टप्प्यातील 25 हजार आणि दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित 75 हजार सौर कृषीपंप बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या महावितरणने पहिल्या टप्प्याचे उद्दीष्ट पूर्ण करीत राज्यभरात तीन व पाच एचपी क्षमतेचे 25 हजार सौर कृषीपंप कार्यान्वित केले आहेत. तर उर्वरित 75 हजार सौर कृषीपंपाचे काम प्रगतीपथावर आहे. 

आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...

महावितरणने एजन्सीसोबत केलेल्या करारानाम्यानुसार शेतकऱ्यांकडे बसविण्यात आलेल्या सौर कृषीपंपाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी 5 वर्ष तर सौर पॅनलसाठी 10 वर्षांचा हमी कालावधी ठरविण्यात आला आहे. या हमी कालावधीत सौर कृषीपंप किंवा सौर पॅनल नादुरूस्त झाल्यास त्याची मोफत दुरुस्ती करण्याची किंवा सौरपंप पूर्णपणे बदलून देण्याची जबाबदारी संबंधीत एजन्सीची राहणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या वादळी पावसामुळे किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे सौर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास सौरपंपाची दुरुस्ती किंवा बदलून देण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे. 

कोथरुड-कर्वेनगरकर, आता स्वत:ला, कुटुंबाला जपणार अन् कोरोनाला हरविणार

शेतकऱ्यांनी सौर कृषीपंप नादुरुस्त झाला असल्यास किंवा सौर पॅनलमध्ये बिघाड झाल्यास 24 बाय 7 सुरु असलेल्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर किंवा महावितरणच्या नजिकच्या कार्यालयात संपर्क साधून तक्रार दाखल करावी. महावितरणकडून संबंधीत एजंन्सीला ही तक्रार पाठवून सौर कृषीपंपाची दुरुस्ती करण्याची किंवा तो बदलून देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL will repair three and five HP agricultural pumps free of cost