‘एमटीडीसी’ रिसॉर्टच ‘लय भारी’!

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पुणे विभागातील महाबळेश्वर, माथेरान, पानशेत, माळशेज घाट, लोणावळा कार्ला, कोयनानगर, भीमाशंकर या सात रिसॉर्टसकडे पर्यटकांचा ओढा दिसत आहे.
MTDC Resort
MTDC ResortSakal
Summary

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पुणे विभागातील महाबळेश्वर, माथेरान, पानशेत, माळशेज घाट, लोणावळा कार्ला, कोयनानगर, भीमाशंकर या सात रिसॉर्टसकडे पर्यटकांचा ओढा दिसत आहे.

पुणे - उन्हाळ्यात (Summer) थंड हवेच्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात (Environment) फिरण्याची मजा औरच! त्यात सरकारी कार्यालयांना सलग सुट्या. (Holiday) त्यामुळे पर्यटकांची (Tourism) पावले थंड हवेच्या ठिकाणी, समुद्रकिनारी वळू लागली आहेत. अशा रम्य ठिकाणी असलेल्या ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टसनाही (MTDC Resort) पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पुणे विभागातील महाबळेश्वर, माथेरान, पानशेत, माळशेज घाट, लोणावळा कार्ला, कोयनानगर, भीमाशंकर या सात रिसॉर्टसकडे पर्यटकांचा ओढा दिसत आहे. सिंहगड व अक्कलकोट येथील रिसॉर्टही येत्या १५ दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुली होणार आहेत.

‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टसाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा आहे. सर्व रिसॉर्ट हे निसर्गरम्य ठिकाणी असून, तुलनेने दर कमी आहेत. सुरक्षितता आणि स्वच्छता यावर अधिक लक्ष दिले जाते. तसेच, १५ ते २० पेक्षा अधिक खोल्यांचे बुकिंग केल्यास २० टक्के सवलत देण्यात येत आहे.

- दीपक हरणे, प्रादेशिक अधिकारी, पुणे विभाग, एमटीडीसी

जास्त पसंती का?

  • ‘एमटीडीसी’चे रिसॉर्ट हे बहुतांश निसर्गरम्य ठिकाणी हिल स्टेशन आणि समुद्रकिनारी आहेत

  • प्रत्येक रिसॉर्टवर उपाहारगृहाची सुविधा, कृत्रिम रंग न वापरता चांगल्या दर्जाचे जेवण उपलब्ध

  • सैन्यदलात कार्यरत आणि सेवानिवृत्त सैनिकांसाठी रिसॉर्टवर राहण्यासाठी २० टक्के सवलत

  • सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दहा टक्के सवलत

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी सोमवार ते गुरुवारपर्यंत २० टक्के सवलत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com