एवढ्या मतांनी जिंकणार कसब्याची सीट; खा. बापटांनी दिले सहीनिशी लिहून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

खासदार बापट यांनी सही निशी व्यक्त केला अंदाज 

पुणे : पुणेे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट हे आपल्या प्रत्येक निवडणुकीनंतर कसबा मतदारसंघात किती मतांनी विजय होणार याचा आकडा खासगीत लिहून ठेवत असत. यंदा बापट कसबा मतदारसंघात निवडणूक लढवित नाहीत, पण त्यांनी आपली पूर्ण ताकद या मतदारसंघात लावली असून भाजपचा उमेदवार या मतदारसंघात 50 हजार मतांनी विजयी होणार असे त्यांनी आज (ता.21) रात्री लिहून ठेवले आहे.

कसबा मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक, कॉंग्रेसचे अरविंद शिंदे, शिवसेना बंडखोर विशाल धनवडे आणि मनसेचे अजय शिंदे अशी लढत होत आहे. खासदार बापट निवडणूक रिंगणात नसल्याने कॉंग्रेस आघाडीने या मतदारसंघात पूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळे शहरात या मतदारसंघात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,  मतदानाची अंतिम आकडेवारी हातात येताच उमेदवारांची आकडेमोड सुरु होते. कोण विजयी होणार, कोण पडणार याचे अंदाजही वर्तविले जातात. कसबा मतदारसंघात सरासरी 52 टक्के मतदान झाले आहे. मतदानाची आकडेमोड केल्यानंतर बापट यांनी या मतदारसंघातून 50 हजार मतांनी भाजप महायुती विजयी होणार असे भाकित व्यक्त केले. रात्री साडे दहा वाजता बापट यांनी आपली स्वाक्षरी करून हे लिहून ठेवले. रात्रीच हा फोटोही व्हायरल झाला आणि त्याची चर्चाही रंगली.

लोकसभेलाही गिरीश बापट यांनी 06 लाख 44 हजार 500 मते मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता तो जवळपास खरा ठरला होता, लोकसबभेला त्यांना 06 लाख 32 हजार 835 मते मिळाली होती. आता विधानसभेचा अंदाज खरा ठरणार काय, हे 24 ऑक्‍टोबरला स्पष्ट होणार आहे. 

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukta Tilak will win by 50000 votes in Kasba VidhanSabha Constituency claims MP Girish bapat