मुळा-मुठा सुधारचे काम लवकरच

Mula-Mutha-River
Mula-Mutha-River

पिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून मागणी येत असून, बस खरेदी व अन्य मार्गांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली जाईल. मुळा-मुठा नदी सुधार योजनेअंतर्गत केंद्राच्या साह्याने लवकरच काम सुरू केले जाईल,’’ असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर ते बोलत होते. जावडेकर म्हणाले, ‘‘मेट्रो प्रकल्पासाठी संरक्षण दलाची परवानगी मिळाली. आगाखान पॅलेस येथे मेट्रो मार्गाची फेरआखणी करण्यात येत आहे. जायकाच्या मदतीने मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प सुरू होत असून केंद्राकडून त्यासाठी एक हजार कोटी रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या योजनेचा औपचारिक प्रारंभ लवकरच होईल.’’ 

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे तसेच आमदार व अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

नाशिक रस्त्याचा आराखडा पंधरवड्यात
नाशिक रस्त्याच्या विस्तारीकरणाचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) येत्या पंधरवड्यात पूर्ण होईल. त्यानंतर दीड महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या वेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com