शहरांतर्गत जलवाहतुकीत मुळा-मुठा नदीचा समावेश - अनिल शिरोळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे  - शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या शहरांतर्गत जलवाहतूक योजनेत पुण्यातील मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांचा समावेश होणार आहे. या संदर्भातील विधेयकात दुरुस्ती करून येत्या जुलैमध्ये हा समावेश होईल, असे खासदार अनिल शिराळे यांनी रविवारी सांगितले. या योजनेमुळे नवी वाहतूक व्यवस्था निर्माण होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

देशभरातील विविध शहरांमध्ये जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने योजना तयार केली असून, पहिल्या टप्प्यात प्रमुख शहरांमधील नद्यांचा समावेश केला आहे. मात्र, या योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा नद्यांचा समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेऊन, संबंधित प्रस्ताव केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक खात्याकडे पाठविला होता. त्याबाबत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली. या दोन्ही नद्यांमध्ये जलवाहतूक सुरू करण्याला त्यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. तशा सूचना संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार येत्या जुलैमध्ये अंतिम मंजुरी मिळेल, असेही शिरोळे यांनी सांगितले. 

Web Title: Mula-Mutha river water transport anil shirole