पुरात अडकलेल्या २२१ जणांची सुटका

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मुळशी धरणातून मुळा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे पौड (ता. मुळशी) येथे एका खोलीत अडकलेल्या नऊ कामगारांची येथील दिगंबरा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली. तसेच, लोणी काळभोर येथील एमआयटीच्या संगीत महाविद्यालयाचे सुमारे २०० विद्यार्थी वसतिगृहात अडकले होते. लोणी काळभोर पोलिस, ग्रामस्थांनी तीन तासांनंतर त्यांना बाहेर काढले. मुंबईचे आठ पर्यटक व चार ग्रामस्थ कोथुर्णे (ता.मावळ) येथे पवना नदीच्या पुरात अडकले होते. त्यांची सुटका एनडीआरएफ व शिवदुर्गच्या कार्यकर्त्यांनी केली.

पुणे - मुळशी धरणातून मुळा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे पौड (ता. मुळशी) येथे एका खोलीत अडकलेल्या नऊ कामगारांची येथील दिगंबरा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली. तसेच, लोणी काळभोर येथील एमआयटीच्या संगीत महाविद्यालयाचे सुमारे २०० विद्यार्थी वसतिगृहात अडकले होते. लोणी काळभोर पोलिस, ग्रामस्थांनी तीन तासांनंतर त्यांना बाहेर काढले. मुंबईचे आठ पर्यटक व चार ग्रामस्थ कोथुर्णे (ता.मावळ) येथे पवना नदीच्या पुरात अडकले होते. त्यांची सुटका एनडीआरएफ व शिवदुर्गच्या कार्यकर्त्यांनी केली.

पौड - मुळशी धरणातून मुळा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पौड येथे एका खोलीत अडकलेल्या नऊ जणांना दिगंबरा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढले. 

पौड येथील झील स्कूलसमोर नदीपात्रात पौडची पाण्याची पंपिंग स्टेशनची खोली आहे. या खोलीत नपाते फाउंडेशनमध्ये काम करणारे नऊ कामगार राहतात. शनिवारी (ता. ३) रात्री ते खोलीत झोपले होते. मुळशी धरणातून रात्री मुळा नदीत ३५००० क्‍युसेक पाणी सोडले. त्यामुळे नदीच्या पात्राबाहेरून पाणी वाहू लागले. त्यामुळे कामगार झोपलेली खोली चारही बाजूने पाण्याने वेढली गेली. खोलीत अडकलेल्या नऊ जणांना बाहेर काढण्यासाठी सकाळपर्यंत मदत मिळू शकली नाही. खोलीत छातीपर्यंत पाणी आले होते. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. दिगंबरा प्रतिष्ठानचे संकेत दळवी, संतोष वाघवले, सागर लांडगे, दशरथ चव्हाण, सूरज पिंगळे, दीपक सोनवणे, रोनीत सुपेकर यांनी दोरीच्या साहाय्याने त्या नऊही जणांना बाहेर काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mula River Flood 221 People Life Saving